जनतेज न्युज

शाळेत धिंगाणा घालणा-यांना तात्काळ अटक करा!

प्राचार्य शृती ओहळे यांची पत्रकारपरिषदेतुन मागणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार

प्रतिनिधी , नागपूर : दि.४ जानेवारी रोजी महर्षी विद्या मंदीर फुलमोगरा येथे शाळेमध्ये अनाधिकृतरित्या प्रवेश करीत शाळेतील कर्मचा-यांना मारहाण करणा-या जमावातील काही लोकांवर पोलीसांनी गुन्हे दाखल केले मात्र त्यांना अद्यापही अटक करण्यात आली नाही करीता शाळेत धिंगाणा घालणा-या जमावातील लोेकांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी महर्षी विद्या मंदीर शाळेच्या प्राचार्या शृती ओहळे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतुन केली.याप्रकरणी आपण राज्याचे राज्यपाल श्री.कोश्यारी यांच्याकडे सुध्दा तक्रार केली असुन याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले.

नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे,आ.नरेंद्र भोंडेकर व शिवसेनेचे कार्यकर्ते अशा शेकडो लोकांच्या जमावासह शाळेत अनाधिकृत रित्या प्रवेश करीत अश्लिल शिवीगाळ करीत शाळेतील शिक्षकांना जबर मारहाण केली.प्रवीण उदापुरे यांनी गेटवरील महिला सुरक्षा रक्षकाला धक्का देत शाळेच्या गेटला लाथ मारीत शाळेत प्रवेश करीत शाळेत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.प्रवीण उदापुरे यांना शाळेच्या आवारात व्हिडीओ शुट करण्यास महिला सुरक्षा रक्षकाने मज्जाव केला असता उदापुरे यांनी त्या महिलेच्या घरावर हमला नेण्याची धमकी दिली तर शिवसेनेच्या महिला पदाधिकारी आशा गायधने व तुरकर यांनी शाळेत पाल्यांची शालेय फि भरण्याकरीता आलेल्या महिला पालकांनासुध्दा मारहाण केल्याचा आरोप प्राचार्या श्रुती ओहळे यांनी यावेळी केला.