प्रतिनिधी , धुळे : धुळे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गाडी चोरीच्या घटना मध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील स्वामी नारायण मंदिर परिसरातून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या दुचाकी गाड्यांच्या एकूण सहा गाड्या चोरी झाल्याची घटना घडली होती. काही दिवसातच देवपूर पोलिसांनी चोरीचा छडा लावत आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे.
काही दिवसांपूर्वी धुळे शहरातील स्वामी नारायण मंदिर परिसरातून 1 लाख 75 हजार रुपये किमतीच्या 6 दुचाकी गाड्यांच्या चोरीची घटना घडली होती. त्यानंतर देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यानुसार देवपूर पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवत काही दिवसात आरोपींना गजाआड करण्यात यश आले आहे, धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेले आरोपी हे सर्व अल्पवयीन आहेत.
