प्रतिनिधी, औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील सिडको परिसरात असलेल्या मुकुंद बालक मंदिर शाळेमध्ये आज विद्यार्थ्यांच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी उंटावरून विद्यार्थ्यांची सवारी काढण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांनी आज पहिल्या वर्गात प्रवेश घेतला कोणते ढोल ताशा वाजवत व ओवाळून स्वागत करण्यात आले अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या गेटपासून वर्गापर्यंत उंटावरून शाळेत प्रवेश देण्यात आला आहे,
पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांची औषन करण्यात आले.दिवसभर शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत विविध गाणे डान्स आणि विविध खेळ खेळण्यात आले यामुळे पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ती आनंद पाहण्यासारखा दिसत होता. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळेच्या वतीने विविध उपक्रम आज रोजी राबवण्यात आली शाळेची रंगरंगोटी करण्यात आली होती शाळेत झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आज विविध खेळ खेळवण्यात आले यासाठी शाळेतील शिक्षकांनाही विद्यार्थ्यांसोबत सहभाग नोंदवला यामुळे विद्यार्थी पहिल्या दिवशी आनंदी दिसत होते. यावेळी शाळेच्या वतीने पहिल्या दिवशी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांच्या ढोल-ताशाच्या पथकाने स्वागत करण्यात आले वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांना फुलगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. पालकांचाही मेळावा घेण्यात आला असून मुकुल बालक मंदिर शाळेचे मुख्याध्यापक परदेशी यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना आज मार्गदर्शन केले शाळेच्या पहिल्या दिवशी विविध उपक्रम मुकुंद बालक मंदिर या शाळेमध्ये घेण्यात आल्याची माहिती आज रोजी देण्यात आली आहे.
