प्रतिनिधी, रायगड : अलिबाग येथील पीएनपी नाट्यगृहाला भीषण आग लागली आहे. या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले आहे. आगीचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. ही आग ४ ते पावणे पाच वाजत लागल्याचे सांगितले जात आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाण दिसत असल्याने आगीने भिषण रुप धारण केल्याचे दिसत आहे. आगीची माहिती कळताच जवळील अग्निक्षमन दल दाखल होत आहेत. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पण शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत नाट्यगृहातील साउंड सिस्टिम, छत आणि खुच्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने आज नाट्यगृहात कोणतेही कार्यक्रम नसल्यामुळे जीविततहानी टळली आहे.
