जनतेज न्युज

शिवनदीत हजारो मृत माशांचा खच, निफाडच्या ब्राम्हणगांव विंचूर येथील घटना

प्रतिनिधी, नाशिक : निफाड तालुक्यातील लासलगाव जवळील ब्राम्हणगांव विंचूर येथे शिवनदी मध्ये मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला असून मासे मृत कशामुळे झाले याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र या मृत झालेल्या माशांमुळे नदीतील वातावरण दूषित झालेले असल्याने सर्वत्र परिसरात दुर्गंधी पसरली आहे. याचा मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने ह्या माशांचा खच व घाण स्वच्छ करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

तसेच शिव नदीजवळ मृत्यू मासे पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.