प्रतिनिधी, नवी मुंबईत : शिवसेना शाखा शिरवणे यांच्या माध्यमातून प्रतिवर्षी तिथी नुसार शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते यावर्षीची शिवजयंती बेलापूर येथील गोवर्धनी देवी येथून सकाळी आरती करून शिवज्योत काढून शिवज्योतीचे आगमन शिवसेना शाखा शिरवणे येथे झाले, या शिवज्योतीच्या उपक्रमात अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला.. पुढील कार्यक्रम नियोजित वेळेत सुरू झाले त्यात,अनेक उपक्रमांचे समावेश आहे.
