जनतेज न्युज

कोपरीत पाण्यावरून वातावरण तापले

प्रतिनिधी, ठाणे : मागील सहा महिन्यापासून कोपरीकरांना पाण्याचा त्रस सहन करावा लागत आहे. यासाठी भाजपच्या वतीने हंडा मोर्चा देखील काढण्यात आला होता. परंतु त्यानंतर आता पाण्यावरुन कोपरीत राजकारण तापल्याचे दिसत आहे. शिवसेना विरुध्द भाजप असा सामना सोमवारी या भागात रंगल्याचे दिसून आले. पाण्याची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पालिका प्रशासनाने दिल्यानंतर त्याचे श्रेय घेण्यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि भाजपचे माजी नगरसेवक आमने सामने आल्याचे दिसून आले.

सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी कोपरी भागातील वॉटरफ्रन्ट डेव्हल्पमेंटचा पाहणी दौरा केला. यावेळी शिवसेनेच्या माजी नगरसेविका मालती पाटील आणि नम्रता पमनानी यांनी कोपरी भागातील पाणी टंचाई बाबत त्यांच्याशी चर्चा केली. मागील अनेक दिवसापासून या भागात पाण्याची समस्या आहे. तसेच धोबी घाट भागातील पाण्याची टाकी जुनी झाली असून त्याठिकाणी नवीन वॉल बसविणो अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार हा वॉल आला असतांनाही तो बसविण्यात न आल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हा वॉल तत्काळ बसविण्यात यावा अशी मागणी करीत पाण्याची समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी घेतले. एकूणच पाण्याची समस्या आमच्यामुळेच मार्गी लागल्याचा दावाही त्यांनी केला.

दुसरीकडे मुळात पाणी कोपरीत कमी का येत आहे, याची माहितीच या मंडळींना नसल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला आहे. मुळात कोपरीला यापूर्वी मुंबई महापालिकेकडून २२ दशलक्ष लीटर पाणी येत होते. त्यातील 6 एमएलडी पाणी ठाणो महापालिकेतील काही अधिका:यांनी इतरत्र वळविले आहे. त्यामुळे कोपरीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचा दावा केला आहे. त्यासाठी आम्ही यापूर्वी पालिकेवर हंडा मोर्चा काढला होता. तसेच लोकसंख्या वाढत असल्याने वाढीव 6 एमएलडी पाण्याची मागणी देखील केली होती. त्यानुसार हे वाढीव पाणी देण्याचा आश्वासन देखील पालिकेने दिले असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु आता मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकूणच मागील सहा महिन्यापासून कोपरीकरांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत होते. त्याचे आता राजकारणात रुंपातर झाले असून कोपरीकरांची पाण्याची समस्या सुटेल की नाही हे सांगता येणो सध्यातरी शक्य नसले तरी देखील पाण्यावरुन कोपरीत आता राजकारण चांगलेच तापल्याचे दिसत आहे.