प्रतिनिधी , राज्य सरकारने कितीही बंदी आणली तरीसुद्धा मोठ्या संख्येने ठाण्यात शिवजयंती उत्सव साजरा होणार..छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवाजी मैदान येथे जयंती मोठ्या उत्साहात पार पाडण्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते .. यावेळी राज्य सरकार आणि शिवसेनेवर देखील समन्वयकानी आरोप करीत टीका देखील केली .आता पर्यंत शिवसेनेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करीत सत्ता स्थापन केली आहे तसेच या कोरोना काळात अनेक कार्यक्रम पार पडले असून सद्याचे काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पाटोळे यांनी देखील शक्ती प्रदर्शन करीत रैली काढली मात्र शिवजयंतीला अटी आणि शर्ती लावून मराठा समाजाला एकत्र न येण्यापासून लांब करण्याचे कारस्थान हे सरकार करत असल्याचे देखील आरोप समन्वयक यांनी केले आहे … तसेच या जयंतीत म्युझिक आर्ट च्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती तयार करणार आहे… आणि शिवणेरीवरून शिवज्योत 19 तारखेला सकळी ठाण्यात आणणार असल्याचे देखील समन्वयकानी सांगितले आहे ..
