जनतेज न्युज

प्रियसीसाठी घरफोड्या करणाऱ्या प्रेमवीराला सांगली पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी , सांगली : प्रियसीची हौस पुरवण्यासाठी आणि तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी घरफोडी करणाऱ्या एका प्रेमवीराला सांगली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर या प्रेमावीराला दुसऱ्यांदा इस्लामपूरमध्ये तुरुंगाची हवा खावी लागली आहे.कुणाल असे या प्रेमवेड्या चोरट्याचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे त्यांच्याकडून सात घरफोड्या उघडकीस आलेले आहेत.
प्रियसीची हौस पुरवणे आणि तिच्यावर प्रभाव टाकणं सांगलीच्या इस्लामपूर येथील एका मजनुला चांगलचं भारी पडले आहे.व्हॅलेंटाईन डेच्या तोंडावर दुसऱ्यांदा तुरुंगाची हवा खावी लागली आहे. कुणाल संजय शिर्के, वय वर्ष 26 ,असे या प्रेमवेड्या तरुणाचं नाव आहे. एका वर्षांपूर्वी कुणाल याने प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी चोरी केल्याचा प्रकार घडला होता.त्या वेळी इस्लामपूर पोलिसांनी कुणाला याला फेब्रुवारी महिन्यातचं बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर पुन्हा जामिनावर कुणाल बाहेर होता आणि प्रेयसीवर असणाऱ्या प्रेमापोटी आणि आपल्या प्रेयसीला खुश करून तिच्यावर प्रभाव टाकण्यासाठी त्याने घरफोडी केल्याचा प्रकार आता समोर आला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून इस्लामपूर शहरातील ५ व कोल्हापूर जिल्ह्यातील २ अश्या ७ घरफोड्या उघडकीस आणत,सहा लाखांच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे हे सोन्याचे दागिने तो आपल्या प्रेयसीच्या जवळ ठेवत असल्याचे समोर आले आहे.