जनतेज न्युज

शेतकर्‍यांने पारंपारिक पिक पध्दतीत बदल करुन केली बटाट्याची शेती…

कमी पाण्यात,कमी खर्चात,कमी वेळात भरघोस उत्पन्न देणारी फायदेशीर बटाटा शेती…
नवीन पिक पध्दतीने नवी प्रकाशवाट…

प्रतिनिधी , जळगाव : पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा या गावातील शेतकरी गजानन मंगरुळे यांनी आपल्या पारंपारिक पिक पद्धतीत बदल करुन बटाट्याच्या शेतीकडे वळले आहे.ते पारंपारिक पिक सोडुन दुसरे कुठलेच पिक घेत नव्हते.परंतु त्यांनी आजुबाजुच्या शेतकर्‍यांकडुन माहिती घेत त्यांनी बाजारपेठेचाही अभ्यास करूनच बटाटा पिकाच्या उत्पादनाकडे वळण्याची एक नवी प्रकाशवाट मिळाली….निश्चितच या नव्या पिक पध्दतीच्या प्रयोगातुन इथल्या अनेक शेतकर्‍यांच्या जीवनात नवी पिक पध्दतीची जणु प्रकाशवाट मिळेल यात शंकाच नाही…
सविस्तर वृत्त असे कि पाचोरा तालुक्यातील खडकदेवळा येथील शेतकरी गजानन मंगरुळे यांचे कडे वडिलोप्रजित 15 एकर शेत जमीन आहे.ते या शेतीत वर्षानुवर्षे फक्त कपाशी,मका,आणि ज्वारी,बाजरी आदी पारंपरिक पद्धतीनेच पिके घेत होते.परंतु त्यांनी आपल्या पारंपारिक पिक पद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी सर्व प्रथम नविन प्रयोग म्हणून फक्त तीन एकर जमीन क्षेत्रात बटाटा पिकाची लागवड केली आहे.त्यांचे बटाटा पिक हे सुमारे एक ते दीड महिन्यांचे झाले आहे.त्यांना बटाटे लागवडीसाठी एकरी सात क्विंटल बेने बियाणे लागले असुन तीन एकरासाठी एकवीस क्विंटल बेने बियाणे लागले आहे.
आता पर्यंत या पिकांसाठी त्यांनी एक वेळेस मटरेल,दोन वेळेस ठिबक सिंचनाव्दारे डिपने खते व बुरशी नाशक सोडले होते.आता पर्यंत त्यांना सुमारे तीस हजार रुपये इतका खर्च करावा लागला आहे.पुढिल दोन महिन्यात साधारण पाच ते दाहा हजार रुपये इतका खर्च करावा लागले.बटाटा पिकाचे उत्पादन हे तीन महिन्यात साधारण येते.या पिकाला सुमारे तीस ते चाळीस हजार रुपये इतका खर्च करावा लागतो.त्यांना या बटाट्याच्या शेती पासुन सुमारे आठ ते दहा लांखाचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकरी गजानन मंगरुळे यांनी सांगितले…
बटाटा शेती फक्त 90 दिवसांची…
बटाटा पिकाची शेती हि फक्त 90 दिवसात येणारे पिक आहे.या पिकाच्या लागवडीच्या 90 दिवसात बटाट्याचे पैसे आपल्या हाती येतात.शिवाय बटाट्याला पाणीही कमी लागत.त्यामुळे एकरी 30 ते चाळीस हजार रुपये गुंतले तरी फक्त 90 दिवसात लांखाचे उत्पन्न मिळते.
लागवडीतील महत्त्वाच्या टिप्स-:
गजानन मंगरुळे यांनी बटाटा लागवडीसाठी सुधारित तंञज्ञानाचा अवलंब केला आहे.
सुरुवातीला पिकाच्या लागवडी विषयी काहीही माहिती नव्हती माञ अन्य शेतकरीकडुन माहिती घेत सुरुवात केली.
उत्पादन खर्च,पाणी,पिक कालावधी, याचा विचार करता हे पिक उत्पादनक्षम वाटले. यातुन आता पुढिल वर्षी बटाट्याचे क्षेञ वाढविण्याचे ठरविले.
अशा रितीने अलीकडील काळात पाण्याची उपलब्धता पाहुन ते क्षेञाचे नियोजन करतात.बटाटा लागवडीचा कालावधी हा प्रामुख्याने थंडीस सुरुवात झाल्यानंतर म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये केली जाते.वांणाची माहिती घेऊनच कालावधी प्रमाणे लगवडीची वेळ साधली जाते.बटाट्याला बीजप्रक्रिया करुन सरीमध्ये ठेवुन त्यावर माती टाकुन ठिबक सिंचनाव्दारे पाणी सोडले जाते.
पाण्याचे नियोजन…
बटाटा पिकाची लागवडीस वेळेस पहिले पाणी दिले जाते.दुसर्या आठवड्यात खांदणी केली जाते.यामुळे ओलावा टिकुन राहण्यास मदत होते.लागवडी नंतर महिन्याच्या तिसर्या आठवड्यात पिक दिसण्यास सुरुवात झाल्यानंतर पाणी दिले जाते. महिन्यात पाण्याच्या पाच पाळ्या प्रत्येक आठवड्यात दिल्या जातात.अशा रितीने महिन्यात पाण्याच्या एकुण पाच पाळ्या महत्त्वाच्या ठरतात..
खतांचा वापर…
खांदणीच्या वेळेस डि.ए.पी.खतांचा वापर केला जातो.तिसर्या पाण्या वेळी अमोनियम सल्फेट व पोटॅश चा वापर केला जातो.त्यामुळे बटाट्यास चमक चांगल्या प्रकारे येऊ शकते. तसेच बुरशी नाशकाचा देखील ठिबक सिंचनाव्दारे वापर केला जातो…
निदंनी खर्चाची बचत…
बटाटा पिकाला निदंनी खर्च लागला नाही.यासाठी त्यांनी बटाटे पिकाचे तणनाशकाचा वापर केला आहे.या बटाटा पिकासाठी मिळ्णार्या तणनाशकाची फवारणी करुन त्यांनी लागणारा निदंनी खर्च व मजुरांचे टंचाईवर देखील मात करून खर्चाची बचत केली आहे.
बटाटा काढणीचे नियोजन…
सध्या गजानन मंगरुळे यांचे बटाट्याचे पिक हे एक ते दीड महिन्यांचे झाले आहे.तिसर्या महिन्याच्या दुसर्या आठवड्यात बटाटा काढणीस सुरुवात केली जाते.तसेच बाजार भावा नुसारही बटाटा पिक हे जमिनीतच ठेवता येते.बटाटा पिकाच्या भावा नुसार काढणी करता येते.हे पिक तीन महिन्याचे असते.
आठ ते दाहा लांखाचे उत्पन्न अपेक्षित…
मंगरुळे यांनी तीन एकर जमीन क्षेत्रात बटाटा पिकाची लागवड केली आहे.त्यासाठी त्यांना एकरी सात क्विंटल बेने बियाणांचा खर्च हा लगवडीस आला आहे.आता पर्यंत त्यांना सुमारे तीस हजारांचा खर्च झाला आहे.त्यांना एकरी 125 क्विंटल उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.आजच्या बाजार भावानुसार त्यांना तीन एकर बटाट्याच्या पिका पासुन सुमारे आठ ते दहा लांखाचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे शेतकरी गजानन मंगरुळे यांनी सांगितले….