प्रतिनिधी , बुलडाणा : आस्मानी व सुलतानी संकटाने आधीच त्रस्त असलेले शेतकऱ्यांची प्रशासनामधील अधिकाऱ्यांकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याचा प्रकार बुलडाणा तालुक्यातील अंभोडा येथून समोर आला आहे.अंभोडा येथील एका शेतकऱ्याकडे असलेल्या गाईला कुत्रीम रेतन करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का व्यतिरिक्त पशु वैद्यकीय हतेडी केंद्राचे पशुधन पर्यवेक्षक यांच्याकडून अधिकचे शुल्क वसूल केल्याचा व्हिडीओ संबंधित शेतकऱ्याने समोर आणला आहे.तर पशु वैद्यकीय हतेडी केंद्राला जोडलेली गावांतील शेतकऱ्यांकडून पशुधन पर्यवेक्षक हे अधिकचे शुल्क घेत असल्याचा आरोप देखील या शेतकऱ्याने केला आहे.पशु वैद्यकीय हतेडी केंद्रातील पशुधन पर्यवेक्षकांचे डॉ. वसंत हांगे असे नाव आहे..
अंभोडा येथील शेतकरी गुलाबराव पवार हे त्याच्या जवळील गाईचे कुत्रीम रेतन करण्यासाठी पशु वैद्यकीय हतेडी केंद्रात शनिवारी 31 जुलै रोजी गेले होते.मात्र केंद्रात पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे उपस्थित नव्हते.फोनवर बोलल्यानंतर डॉ. वसंत हांगे हे अंभोडा आले व गाईचे गाईचे कुत्रीम रेतन केल्यानंतर शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या 41 रुपयांचे शुल्का व्यतिरिक्त 550 रुपयांची मागणी त्यावरून गुलाबराव पवार ह्यांनी ज्यांच्या जवळील 300 रुपये दिले व उरलेले 250 रुपये उधार ठेवले.मात्र याबाबतचा व्हिडीओ सदर शेतकऱ्यांनी तयार करून समाज माध्यमांसमोर आणला आहे.तर पशु वैद्यकीय हतेडी केंद्राला जोडलेली गावांतील शेतकऱ्यांकडून पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे अशाचप्रकारे अधिकचे शुल्क घेत असल्याचा आरोप देखील शेतकरीं गुलाबराव पवार यांनी केला आहे केला आहे.तर पशु वैद्यकीय हतेडी केंद्राचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे यांच्याकडून शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का व्यतिरिक्त अधिकचे शुल्क वसूल केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर याबाबतची गंभीर दखल जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतली असून जिल्हा परिषदेचे जिल्हा पशु संवर्धन अधिकारी दिवाकर काळे हे या व्हिडीओची चौकशी करीत आहे.तसेच अंभोडा येथील शेतकऱ्यांकडून गाईचे कुत्रीम रेतन करण्यासाठी अधिकचे शुल्क घेतल्याचा व्हिडीओ समोर आल्याने आपली बाजू मांडताना पशु वैद्यकीय हतेडी केंद्राचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे म्हणाले की मी,संध्याकाळी माझी ड्युटी संपल्यावर संध्याकाळी अंभोडा येथे शेतकरी गुलाबराव पवार यांच्या गाईचे कृत्रिम वेतन करण्यासाठी गेलो होतो.अंभोडा जाण्यासाठी वाहनात डिझेल लागते म्हणून अतिरिक्त शुल्क आकारले आहे.आणि शासकीय ड्युटी संपल्यावर जनावरांचा उपचार केल्यानंतर अधिकचे शुल्क आम्ही आकारू शकतो अशी प्रतिक्रिया डॉ. वसंत हांगे यांनी मोबाईलवरून दिली.
ग्रामीण भागातील शेतकाऱ्यांचकडे गाय, बैल, म्हशी, आदी जनावरे असतात त्यांचे संगोपन व्यवस्थित करीत असून या जनावरांचा उपचार करण्याची मात्र त्यांच्या आरोग्य तपासणी किवा उपचार करण्याची व आरोग्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशु संवर्धन विभागाकडे असून ग्रामपंचायत स्तरावर पशु वैद्यकीय केंद्रामार्फत पशु संवर्धन अधिकारी यांच्या वैद्यकीय टीम पार पाडतात. मात्र ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा ग़ैरफ़ायदा घेत तपासणीसाठी आलेल्या पशु वैद्यकीय अधिकारी शेतकऱ्याकड़ून अतिरिक्त जास्तीचे पैसे घेऊन आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार व्हिडीओ मूळे समोर आला आहे.बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांकडे जवळपास 5 लाख 30 हजार जनावरे आहेत.
