प्रतिनिधी , भंडारा : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणाऱ्या कोरो ना योध्यानी न्याय मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोशनाला सुरुवात केली आहे.
Vo- कोरो ना महामारीच्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरो ना रुग्णसेवे करिता कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. तेव्हापासून हे कर्मचारी कोरो ना योद्धे रात्रंदिवस आपला जीव धोक्यात घालून सेवा देत होते. मात्र मागील चार महिन्यांपासून त्यांचे मानधन देण्यात आले नाही तसेच त्यांचा कोरो ना योद्धे म्हणून सत्कारही करण्यात आलेला नाही. उलट त्यांना कामावरून काढून टाकण्यात आले.
या अन्यायाविरोधात कोरो ना योद्यानी सामाजिक कार्यकर्ते नितीन तूमाने यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे
