प्रतिनिधी , वर्धा : पशुचिकित्सा व्यवसायी संघटनामहाराष्ट्र शाखा वर्धा आणि पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवस्थापन सेवा संघाच्या पशुसंवर्धन पदविका धारकांनी विविध मागण्यांना घेऊन 1 ऑगस्ट 2021 पासून बेमुदत संप पुकारला असून वर्धा शहरातील महात्मा गांधी चौकात 2 ऑगस्टला मंगळवारीही हा संप सुरू आहे यात अनेक पशुवैद्यकांचा सहभाग आहे. हे आंदोलन चिघळण्याआधी मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
या आंदोलनात खासगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसंदर्भात घोषणा दिल्या.खासगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी आपापल्या वतीने विविध वेगवेगळ्या मागण्या केल्या.या आंदोलन मंडपाला हिंगणघाट माजी आमदार राजू तिमांडे,सामाजिक कार्यकर्त्या अंबिका हिंगमीरे, यांनीही भेट देत चर्चा केली.राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एच एम लोखंडे यांनी मंडपाला भेट देताना आंदोलकांनी त्यांना निवेदन सादर केले. आणि घोषणा केल्या.
आंदोलनातील नेमक्या मागण्या आणि समस्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रियांतून स्पष्ट केल्या.
