प्रतिनिधी, धुळे- 1 जानेवारी 1818 मध्ये कोरेगाव भीमा येथे इंग्रज आणि पेशवा यांच्यातील युद्धात इंग्रज सैन्यात असलेल्या महार बटालियन मधल्या 500 शुर सैनिकांनी पेशव्यांवर विजय मिळवून दिला होता. त्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या विजय स्तंभाची प्रतिकृती असलेल्या धुळे शहरातील भीम नगर येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अभिवादन कर्त्यांनी गाणी म्हणत शुरविरांना अभिवादन केलं
