प्रतिनिधी, उस्मानाबाद- राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुली, महिला यांच्यावर अनेक ठिकाणी अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात हॉस्पीटलमध्ये सुध्दा महिलांवर अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या. तरी देखिल गृह मंत्र्यांनी आत्तापर्यंत झालेल्या दुर्दैवी घटनांवरती कुठल्याही प्रकारची ठोस पावले उचलली नाहीत. सरकारने गाजावाजा करत महिलांवरील आत्याचार रोखण्यासाठी ‘शक्ती’ हा कायदा पुढे आणला. पण याची अंमलबजावणी करण्यास हे ठाकरे सरकार कुचकामी ठरत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे महिला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करा. अन्यथा, भाजपा युवा मोर्चा तीव्र आंदोसन छेडेल असा इशारा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजे निंबाळकर यांनी दिला आहे.
