जनतेज न्युज

श्रीसंस्थान मुक्ताईनगरची पालखी जालन्यात दाखल

प्रतिनिधी , जालना : श्रीसंस्थान मुक्ताईनगरच्या आदिशक्ती मुक्ताबाई यांची पालखी दर – सालबादा प्रमाणे पंढरपूर कडे प्रस्थान करते. 313 वर्षांची परंपरा असलेली ही मुक्तबाईंची पालखी  बुलढाणा जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथून   जालना जिल्हयात दाखल झाली. या पालखीत दोन ते अडीच हजार महिला, पुरुष,  यांचा समावेश आहे. यावेळी भाविक भक्तांकडून या पालखीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.

मागील 2 वर्षापासून  कोविडमुळे थांबलेली पालखी यावर्षी 3जून मुक्ताई नगर येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. बुलढाणा जिल्हयातील 13 ते 14 किलोमीटरचा बुलढाणा जिल्ह्यातील पहिला टप्पा पार करत शुक्रवारी ही पालखी जालना जिल्हयात दाखल झाली आहे. गेल्या 2 वर्षांपासून थांबलेली पालखी यंदा सुरु झाल्याने भाविकांमध्ये आंनद आहे. 313 वर्षाची परंपरा असलेल्या तापितीर ते भिमातीर अशा हि पालखी आहे. या पालखीत विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश आदी ठिकाणच्या भक्तांचा समावेश आहे. यंदा महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी लसींचे दोन डोस घेतले आहेत. त्यांनाच वारीमध्ये प्रवेश दिला आहे. तसेच सर्व वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच पालखी सोबत जळगाव जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे पथक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाण्याचे टँकर देण्यात आले असल्याची माहिती पालखी प्रमुख ह. भ. प. रवींद्र महाराज हरणे यांनी यावेळी दिली.