प्रतिनिधी , वर्धा : कारंजातील दरोडा प्रकरणातील टोळी तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात
आर्वीच्या गोल्डमॅन हत्या प्रकरणातील आरोपींकडून कारंजातील दरोडा प्रकरणाचा खुलासा
कारंजा येथे जानेवारी महिन्यात निवृत्त शिक्षक दाम्पत्याच्या घरी शस्त्राच्या धाकावर घातलेल्या दरोडा प्रकरणी दरोडेखोरांचा शोध सुरू असताना आर्वी येथे 15 दिवसांपूर्वीच घडलेल्या गोल्डमॅन हत्या प्रकरणी अटकेत असलेले आरोपीच कारंजा प्रकरणातील दरोडेखोर असल्याचं समोर आलं आहे.. त्यामुळे पोलीस गेल्या पाच महिन्यांपासून ज्या आरोपींच्या शोधात होते त्या आरोपींना अखेर अटक करण्यात यश आले आहे.
या आरोपींकडून दरोडा प्रकरणातील सोनं, रोख रक्कम,महागडे मोबाईल फोन्स,चाकू असा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पूढील तपास सुरू असून आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
आरोपी १) अक्षय रमेशराव सतपाळ, २) मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन, ३) विनोद दयाराम कुथे, ४) शेख शाहरुख शेख रऊफ, सर्व रा.आर्वी यांना अटक करण्यात आली आहे..वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने ही कारवाई केली आहे.
