प्रतिनिधी, ठाणे : श्री मा विद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाण्यातील विविध शाळांसाठी योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. इ. ५ वी ते १० वी तील मुलामुलींसाठी आयोजित ही ‘योग’ स्पर्धा श्री महाविद्यालय येथे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण ठाण्यातील 25 शाळांनी सहभाग घेतला होता विद्यार्थ्यांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी त्यांचं आरोग्य व शरीर सुदृढ राहावं या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी शाळेच्या वतीने करण्यात येते यंदाही घोडबंद रोड येथील श्री मा विद्यालयात ही स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये ठाण्यातील शाळेतील शेकडो विद्यार्थ्यांनी आपली योगसाधना यावेळी सादर केली यामध्ये सोलो व समूह अशा दोन श्रेणींमध्ये झालेल्या स्पर्धेत मुलामुलींना विविध योगासनांची व योग मुद्रांची प्रात्यक्षिके सादर करून दाखविली यामध्ये ताडासन, पवन मुक्तासन, धनुरासन, शलभासन, चक्रासन, पादहस्तासन, पश्चिमोतानासन, हलासन, द्रोणासन, नौकासन, भ्रामरी प्राणायाम, गोमुखासन, भत्यासन, सर्वांगासन, त्रिकोणासन मार्जारासन, उष्त्रासन, उग्रासन व उत्ताण वक्रासन आदी योगासनांचा त्यामध्ये समावेश होता
विजय विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे
