जनतेज न्युज

संजय राठौड़ यांनी राजीनामा दिला पन कारवाहीच काय ? खा हीना गावित याचा महाराष्ट्र शाषन ला सवाल ….

प्रतिनिधी ,नंदुरबार : वन मंत्री संजय राठोड यांनी आपला पदाच्या राजीनामा दिला असला तरी जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही तो तोपर्यंत भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही असे खासदार व राष्ट्रीय प्रवक्ता हिना गावित यांनी सांगितले .पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर टिकेची सुई फिरत असताना अखेर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला खरा पण राजीनामा दिला असला म्हणजे त्यांना शिक्षा मिळाली असं होत नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे व त्यांच्यावर एफ आय आर दाखल व्ह्ययला पाहिजे. पोलीस त्याचा वर गुन्हा का दाखल करत नाही, पोलिसांवर मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे असे एकंदरीत चित्र दिसत आहे .जोपर्यंत संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यन्त भारतीय जनता पार्टी आंदोलने व निषेध करतच राहील असे खासदार हिना गावित यांनी सांगितले…