जनतेज न्युज

केडीएमसीच्या जंबो कोविड सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार,,, पचार घेणा:या महिलेचा वॉडबॉयने केला विनयभंग,,,पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल,, आरोपीचा शोध सुरू

प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : दोन दिवसा पूर्वी सुरु झालेल्या केडीएमसीच जंबो कोविड सेंटरमध्ये एका महिलेचा विनयभंग झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी वोर्डबॉय च्या शोध सुरू केला आहे.एका समाजसेवकाच्या पुढाकाराने हा प्रकार उघडकीस आला आहे.
कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या आधी कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. काही महिन्यापूर्वी कल्याण पश्चिम येथील लाल चौकी परिसरातील आर्ट गॅलरीत जंबो कोविड सेंटर तयार करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड सेंटर तयार होऊन पडून होते. आत्ता कोरोना रुग्ण वाढत असल्याने हे सेंटर दोन दिवसापूर्वी सुरु करण्यात आले आहे. या कोविड सेंटरमध्ये दोन दिवसापूर्वी प्रसूती झालेली एक महिला ही कोविड पॉझीटीव्ह झाल्याने उपचारासाठी दाखल झाली. या महिलेचा सेंटरमधील एका कर्मचा:याने विनयभंग केला. महिलेने हा सगळा प्रकार महिला डॉक्टरसह तिच्या पतीला फोन वर कळविला. समाजसेवक अजय सावंत यांच्या पुढाकाराने हे प्रकरण बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोहचले. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिसनिरिक्षक यशवंत चव्हाण यांचे म्हणणे आहे की, सदर घटनेसंदर्भात पोलिसांना तक्रार प्राप्त आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी श्रीकांत मोहिते याला लवकरात लवकर लवकर अटक केली जाईल हा वॉर्डबॉय खाजगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे परंतु आम्ही तपास करणार आहोत आरोपी श्रीकांत मोहिते याचा शोध सुरु आहे. या बाबत समाज सवेक अजय सावंत याचे म्हणणे आहे की, हा प्रकार कोविड सेंटरमध्ये घडला आहे. हा दुदैवी प्रकार आहे. महिला वार्डात महिला कर्मचारी नियुक्त केले गेले पाहिजे. पोलिसांनी विनयभंग करणा:याच्या विरोधात कथोरे कारवाई केली पाहिजे. श्रीकांत हा दोन दिसवसापूर्वीच कामाला लागला होता. याप्रकरणी पीडित महिलेच्या कुटुंबियांनीी नाराजगी व्यक्त करत महिला कॉल सेंटर मध्ये महिला डॉक्टर महिला कर्मचारी काम करावे अशी मागणी केली आहे