प्रतिनिधी , सोलापूर : श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीचे उस्मानाबाद जिल्हयातून सोलापूर जिल्हयातील मुंगशी गावात प्रवेश झाला असून प्रशासनाच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले. श्री संत एकनाथ महाराजांच्या पालखीत पैठण ते पंढरपूर पायी दिंडीमध्ये अबालवृद्धासह 6 ते 7 हजार स्त्री पुरुष वारकरी आहेत.टाळ,मृदुंग व विठ्ठल हरिनामाच्या जयघोषमध्ये व फटाक्यांची आतिषबाजी करून पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तहसिलदार राजेश चव्हाण,गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, माजी सभापती विक्रमसिंह शिंदे,निवासी नायब तहसिलदार विजय लोकरे,पाणीपुरवठयाचे अभियंता ए डी वाघमारे,कुर्डुवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, तालुका वैद्यकीय अधिकारी शिवाजी थोरात,महावितरणचे अभियंता राजमाने,उपस्थित होते.
