जनतेज न्युज

स्वस्त धान्य दुकानदार महासंघाच्या वतीने तहसील समोर धरणे आंदोलन

प्रतिनिधी , बुलडाणा : ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्या वतीने दिल्ली येथे ८ जून २०२२ रोजी व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक महासंघाच्या वतीने ३१ मे रोजी मुंबई येथे पदाधिकाऱ्यांची संपन्न झाली होती. देश पातळीवर वारंवार आंदोलन व मागण्यांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारकडे संघटनेचे जनरल सेक्रेटरी विश्वंभर बसू यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार केंद्र सरकारने फक्त कमीशनमध्ये २० रू. व विशेष दर्जा प्राप्त राज्यांसाठी ३७ रू. कमीशनमध्ये वाढ केली. ही केलेली वाढ समाधानकारक नसून सर्व राज्यातल्या प्रतिनिधींनी या केलेल्या वाढीला आपला विरोध दर्शविलेला आहे.देश पातळीवर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत कोव्हिड-१९ अंतर्गत कोरोना भिषण महामारीच्या काळात देशपातळीवरील स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या जिवाची पर्वा न करता ८० करोड जनतेला सरकारने कोणतेही साधन उपलब्ध नसतांनाही धान्याचे अविरत वाटप केले. त्यामुळे या महामारीच्या काळात कोणीही भूकबळी झाला नाही, याची दखल सरकारने न घेता परवानाधारकांना कोरोना योद्धा घोषित न करता कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या परीवाराला कोणताही मोबदला दिला नाही, ही खेदाची बाब आहे. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाद्वारे गठीत केलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम अंतर्गत त्यांच्या रिपोर्टवर ४४० /- रू. कमीशन प्रति क्विंटल देण्यात यावे अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर भारत सरकार द्वारा टोलवाटोलवी करण्यात येत आहे.यासह विविध मागण्यांसाठी आज शेगांव तहसील समोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.