प्रतिनिधी , जवळपास वर्षभर असलेले टाळेबंदीचे परिणाम अजूनही सामान्य नागरिकांना जाणवत आहेत, आधीच टाळेबंदी त्यात दररोज होणारी इंधन दरवाढ त्यामुळेच सामान्य मुंबईकर आता हैराण झाले आहेत, गेल्या वर्षभरात महागाईचा आलेख वाढतच राहिला आहे त्यातच आता अवकाळी पावसामुळे व सततच्या इंधन दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांना आता भाजीपाला सुद्धा महाग दरातच मिळणार आहे म्हणजेच यापुढे सामान्य मुंबईकरांना भाजीपाला सुद्धा जपून वापरावे लागणार आहे कारण अवकाळी पावसामुळे तसेच इंधन दरवाढीमुळे भाजीपाला सुद्धा महाग झाला आहे,
भाजी मार्केटमध्ये सध्या फ्लॉवरची आवक कमी झाली असून वाटाने, व इतर भाज्या सुद्धा महाग झालेला दिसत आहे.
यावर भाजी मार्केट मधील भाजी विक्री त्यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली असून पेट्रोल डिझेल कमी झाल्यास भाजी दर निश्चितच कमी होतील असा विश्वास दाखवला.
