जनतेज न्युज

सर्वसामान्यांची दिवाळी होणार गोड… यावेळी जिल्ह्यातील सर्वच लाभार्थ्यांना मिळणार रेशन ची साखर…

प्रतिनिधी , बुलडाणा : कोरोना जागतिक महामारी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील एपीएल धारक प्रत्येक कुटुंबाला आता रेशन ची एक किलो साखर विस रुपये किलो ने वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे अन्न पुरवठा विभागाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिवो – जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंब , एपिएल धारक, आणि अंत्योदय शिधापत्रिका धारक असलेल्या ४ लाख ८२ हजार ९६२ शेतकरी कुटुंबांना या साखरेचा लाभ मिळणार आहे. आधी फक्त अंत्योदय शिधापत्रिका धारकांना याचा लाभ देण्यात येत होता, मात्र कोरोना संसर्गामुळे राज्यातील १४ जिल्ह्यातील एपिएल धारक व प्राधान्य शेतकरी कुटुंबांना देखील साखरेचा लाभ देण्याचा निर्णय अन्न व पुरवठा विभागाने घेतला आहे.
जिल्ह्यातील प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी ३,३७४ क्विंटल तर एपिएल शेतकरी शिधापत्रिका धारक कुटुंबासाठी ८५२ क्विंटल असा एकूण ४,२२६ क्विंटल साखरेचा पुरवठा जिल्ह्यात करावा लागणार आहे. संबंधित विभागाने हा निर्णय ९ नोव्हेंबर रोजी घेतल्याने आधी जिल्ह्यातील पुरवठादारांकडून या साखरेचा करार करावा लागणार आहे त्यानंतर नागरिकांना ही साखर उपलब्ध होणार आहे मात्र यासाठी पुरवठा विभागाने युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू केल्याने या आठवड्यातच ही साखर वितरित केली जाणार आहे.