जनतेज न्युज

सांगलीत मॉडीफायड दुचाकी गाड्यांच्या सौन्दर्य स्पर्धा पोलिसांनी उधळळ्या.

100 वाहने झाली होती सहभागी ; 34 गाड्या पोलिसांनी पकडल्या तर 71 वाहने चालकासह पसार : 10 स्पर्धक ताब्यात: सांगली शहर पोलिसांची कारवाई

प्रतिनिधी , सांगली : नजीक असलेल्या सांगलवाडीच्या ग्राउंडवर मॉडीफाय दुचाकीच्या भरवण्यात आलेल्या स्पर्धा शहर पोलिसांनी उधळून लावल्या. या कारवाईत 37 मॉडीफाय गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कारवाईनंतर 71 वाहन चालक आपल्या वाहनासह पसार झाले तर 37 वाहने सापडली आहेत. विनापरवाना व कर्कश आवाजात गाड्याच्या असल्याची माहिती सांगली शहर पोलीस ठाण्यात मिळाल्यानंतर सांगली पोलिसांनी स्पर्धेच्या ठिकाणी जाऊन तब्बल 37 गाड्या ताब्यात घेतल्या तर 71 गाड्या घेऊन तरुण पसार झाले आहेत. या कारवाईत स्पर्धा आयोजकासह 10 ते 12 जणांना घेण्यात आले आहे. यातील बरेच जण कोल्हापूर जिल्ह्यातील असून सांगलीत स्पर्धसाठी आले होते तर ही स्पर्धा पाहण्यात आलेल्या काहीजणांना पोलिसांनी दंडुकाचा प्रसाद दिला. या ताब्यात घेतलेल्या गाड्या शहर पोलिसांनी जप्त केल्या असून पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल बागाव यांनी ही कारवाई केली आहे. पसार झालेल्या 71 गाड्यांच्या चालकांचा शोध सुरू आहे.