प्रतिनिधी , सांगली : सांगलीच्या कारंदवाडी येतील प्रभाकर पाटील यांच्या शेता जवळील नदीपात्रात मासे पकडण्यासाठी लावलेल्या जाळीत मगरीचे पिल्लू गंभीरित्या अडकलेले आढळले.. आणि घटनास्थळी ग्रामस्थांनी मगरीच्या पिल्लाला काईलीच्या सहाय्याने जवळ जाऊन जाळी कापुन तिला अडकलेल्या जाळीसहित नदी बाहेर काढले… पण पिल्लू गंभीरपणे अडकल्याने त्यातून पिल्लाला सोडवणे त्यांना अवघड झाले.. त्यांनी सदर घटना ॲनिमल राहत संस्थेस कळवली.. आणि ॲनिमल राहतचे प्राणी कल्याण निरीक्षण कौस्तुभ पोळ,योगेश इनामदार,प्रसाद सुर्यवंशी घटना स्थळी पोहोचले… त्यांनी मगरीच्या पिल्लाची कमीतकमी वेळात तिची मानवीय पद्धतीने हाताळणी करून तिला जाळीतून मुक्त केले.. आणि तिला नैसर्गिक अधिवासात सोडले…
