प्रतिनिधी , नागपूर : प्रेम प्रकरणाला विरोध असल्यानं आजी आणि नातवाची हत्या झाल्याच्या प्रकरणाला एक दिवस उलटत नाही तोच आज पुन्हा प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणाची हत्या झालीय. 30 वर्षीय किशोर नंदनवार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मृतकाचे दुसऱ्या धर्मातील तरुणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र, तरुणीचा भाऊ आरोपी रिआज खान याचा या प्रेमाला विरोध होता. यापूर्वी रिआज ने किशोर ला बहिनीसोबत न भेटण्याची तंबी दिली होती. मात्र, किशोर ने याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळं चिडलेल्या रिआज ने आज सकाळी किशोरला यशोधरा नगर भागातील मांजरा रेल्वे अंडर ब्रिज खाली बोलावले. त्याठिकाणी किशोरची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रिआज ला अटक केलीय. प्रेम प्रकरणातून हत्येची चार दिवसात ही तिसरी घटना आहे.
