प्रतिनिधी , सांगली : सांगली महापालिका क्षेत्रात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले आहे… या कुत्र्यांना पकडण्यासाठी सांगली आणि मिरजेला स्वतंत्र 2 डॉग युनिट कार्यरत केले असून याद्वारे मोकाट कुत्री पकडण्यात येत आहेत…
मनपा क्षेत्रात वाढलेल्या भटक्या श्वानांना पकडून त्यांची उत्पत्ती थांबावी यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना उपायुक्त रोकडे यांनी केल्या… याचबरोबर ज्या ज्या भागात भटक्या कुत्र्यांचे आणि विशेषकरून नागरिक व बालकांवर हल्ले झालेल्या परिसरातील मोकाट कुत्री तातडीने पडण्याचे आदेशही उपायुक्त रोकडे यांनी दिले… तसेच मनपा क्षेत्रात कुत्री पकडण्याची मोहीम ही नियमित ठेवावी यासाठी आवश्यक ती यंत्रणा प्रशासनाकडून उपलब्ध केली जाईल असेही उपायुक्त राहुल रोकडे यांनी बैठकीत सांगितले.
