ट्रेनसमोर उडी घेत मामा भाची ची आत्महत्या !
प्रतिनिधी , कल्याण डोंबिवली : मामा भाचीने अंबरनाथ रेल्वे स्थानकानजीक ट्रेन समोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. प्रीती अनंता धादवड आणि योगेश गोपीचंद बेंडारे असे आत्महत्या करणाऱ्यांची नावे असून दोघेही अंबरनाथ तालुक्यातील खुंटवली गावातील राहणारे होते.दरम्यान या दोघांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःच मोबाईल व्हॉटअपच्या स्टेटसवर श्रद्धांजली वाहिली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान रेल्वे पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, हे दोघे रुळावर कसे आले त्यांनी आत्महत्या केली का आत्महत्येचे कारण काय आहे याचा तपास सुरू आहे . या दोघांच्या आत्महत्येमुळे ते राहत असलेल्या भागात शोककळा पसरली आहे.
आत्महत्या करणारे प्रीती आणि योगेश हे दोघे नात्याने मामा – भाची असल्याची माहिती समोर आली दिसुन या दोघांमध्ये प्रेम प्रकरण असल्याचे बोलले जात असून या प्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.
