जनतेज न्युज

औरंगाबाद च्यायला सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथे संतप्त ग्रामस्थांची दगडफेक केली आहे. पोलिसांचा हवेत गोळीबार.

केळगाव येथील महिला पोलिस पाटील अात्महत्या प्रयत्न प्रकरण, पोलिसांच्या दोन गाड्या फोडल्या, गावात बंदोबस्त
प्रतिनिधी , औरंगाबाद : औरंगाबाद च्या सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिला पोलिस पाटील निर्मला ईवरे यांची तब्येत खालावल्याने संतप्त गावकऱ्यांनी पोलिसांच्या दोन गाड्या फोडून जमाव आरोपींच्या घराची नासधूस करीत असल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हवेत गोळीबार केला. दगडफेक करणाऱ्या जमावातील चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केळगावच्या महिला पोलिस पाटील निर्मला ईवरे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याऐवजी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने पोलिस सदरील प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा संशय गावकऱ्यांना आला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी केळगावात तैनात दंगा काबू पथकावर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास दगडफेक केली. आरोपी रामदास वाघ कुटुंबीयांच्या घराची नासधूस करण्याचा प्रयत्न केला. सदरील आरोपी गावात नसल्याने बालंबाल बचावले. प्रकरण हाताबाहेर जात असल्याची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. शेवटी आक्रमक गावकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. हवेत गाेळीबार करताच जमाव पांगला व बहुतांश लाेक शेताकडे पळून गेले. केळगावात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील केळगावात गेल्याची माहिती आहे.
मरणाच्या दारात गेल्यानंतर पोलिसांनी केला गुन्हा दाखल
निर्मला बाळासाहेब ईवरे यांनी ग्रामपंचायतीचा शिपाई रामदास विठ्ठल वाघ त्याची आई मिरा विठ्ठल वाघ यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करित असल्याचा व्हिडिओ व्हायरल करित विष प्राशन केले होते. ग्रामीण पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे महिला पोलिस पाटलावर विष घेण्याची वेळ आली. यानंतर महिलेच्या पतीसह केळगाव येथील नागरिकांचा जत्था पोलिस अधिक्षक कार्यालयावर धडकला. संबंधितांच्या विरोधात तक्रार देण्याच्या मागणीसह गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत कार्यालयातून न हलण्याचा पवित्रा घेतला. प्रकरणात वरिष्ठांनी पावले उचलल्यानंतरच सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य बघता पोलिस यंत्रणेत गावपातळीवर समन्वयाचा घटक असलेल्या पोलिस पाटलावरच न्याय मिळवण्यासाठी आत्महत्या करण्याची वेळ येत असेल तर सर्वसामान्यांची काय परिस्थिती होत असेल हा प्रश्नच आहे. प्रकरणात संशयित आरोपी रामदास विठ्ठल वाघ, मीरा विठ्ठल वाघ यांना अटक करून शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन देण्यात आला.
असल्याची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहूल, सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गंभीर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली. या घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला. शेवटी आक्रमक गावकऱ्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. हवेत गाेळीबार करताच जमाव पांगला व बहुतांश लाेक शेताकडे पळून गेले. केळगावात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील केळगावात गेल्याची माहिती आहे.