जनतेज न्युज

साताऱ्यात शिवसैनिकांनी केला बंडखोर आमदारांचा जाहीर निषेध

प्रतिनिधी, सातारा : राज्याच्या महाविकासआघाडी तून फारकत घेत शिवसेनेशी बंडखोरी करणारे मंत्री शंभूराजे देसाई एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांना विरोधात साताऱ्यातील शिवसैनिकांनी नाक्यावर निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या पाठीशी आम्ही कट्टर शिवसैनि खंबीरपणे उभे आहोत अशा घोषणा ही या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांनी दिले आहेत .यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते यामध्ये 25 हून अधिक शिवसैनिकांनी सहभाग नोंदवत बंडोकर आमदारांच्या विरोधात जाहीर घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केला आहे. या आंदोलन प्रकरणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सातारा पोलिसांनी संबंधित सर्व 25 शिवसैनिक ताब्यात घेतली आहे