जनतेज न्युज

चौगाव चुंचाळे रस्त्यावरील पुलाच्या भिंतीला गेला तडा, नागरिकांनी केली तक्रार

प्रतिनिधी, जळगाव : चोपडा लासुर रस्त्यावरील चौगाव गावाजवळील पुलाचे काम सुरू होतं हे काम अंतिम टप्प्यात आले असून परंतु पुलाला जोडलेले संरक्षण भिंती यांना तडा गेला असल्याचं तक्रार चौगाव गावातील नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली होती या तक्रारीवरून बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर हे घटनास्थळीत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी केलेले पाहणीनंतर त्यांना विचारणा केली. असता त्यांनी सांगितले की चौगाव गावाजवळील पुलाला तडा गेला असल्याची तक्रार नागरिकांकडून मिळाले होते आज प्रत्यक्ष पुलाची पाहणी केली असता पुलाला जोडलेली संरक्षण भिंतीचे पापुद्रा निघाला आहे तो तडा सारखा दिसतो त्यापासून पुलाला काही धोका नाही आहे ठेकेदाराला पापुद्रा काढून व्यवस्थित काम करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ज्युनिअर इंजिनियर सोपान रावसाहेब यांनी सांगितले.