जनतेज न्युज

सामना आम्ही नेहमीच वाचतो,त्यात आमच्यावर टिकेशिवाय फार काही नसतं- चंद्रकांत पाटील

प्रतिनिधी , पुणे-सामनात वापरण्यात येणाऱ्या भाषेवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रश्मी ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.यात त्यांनी ‘मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही सुसंकृत आहात, त्यामुळे तुम्हाला ही भाषा आवडत नसेल. पण ती भाषा तुम्हाला आवडत असेल तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा,असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.

संजय राऊत यांनी या पत्राला कंप्लेट नावाचे रूप दिले आहे.याचसोबत सामना आम्ही नेहमीच वाचतो, आमच्यावर टिकेशिवाय फार काही नसतं.संजय राऊत घाबरत नाही असं म्हणाले, पण ते रश्मी वहिनींना घाबरत नाहीत, असे म्हणत असावेत,असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.