जनतेज न्युज

सिल्लोड येथे नगर परिषद च्या मनमानी कारभारा विरूद्ध भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

प्रतिनिधी , औरंगाबाद : सिल्लोड नगर परिषदेने भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष कमलेश कटारिया याच्या मालकीची औरंगाबाद जळगाव मार्गावरील सव्हे नंबर 39/3 मधील जागेवर बांधलेली संरक्षण भिंत पाडल्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड येथे भाजपाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलन कर्त्यानी नगर परिषद प्रशासना च्यायला निषेधार्थ जोरदार घोषणा बाजी केली. जुलमी प्रशासन हाय हाय, नगर परिषद चालवणाऱ्या राज्यमंत्री अब्दुल सत्तार व पुढाऱ्यांचे करायचे काय खाली मुंडके वरती पाय. नगरपरिषद सत्ता धारी हाय हाय अशा गगनभेदी घोषणा बाजी करण्यात आली. हा रास्ता रोको सुमारे दोन तास चालला यावेळी सुमारे दोन्ही बाजूने तीन तीन किलमीटरवर वाहने उभी होती. यावेळी माजी आमदार सांडू पाटील लोखंडे सह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.