प्रतिनिधी, ठाणे : आर्थिक दुर्बल घटकांना सुप्रीम कोर्टाने 10 टक्के आरक्षण सोमवारी लागू केले. सुप्रीम कोर्टाचा या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत महाराणा प्रताप राजपूत महासंघ वतीने लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला,
संविधानाच्या १०३व्या घटना दुरुस्ती अधिनिमय २०१९ नुसार केलेली तरतूद हि वॆद्य असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्या नांतर आवाज ठाणे शहरातील संघटनांनी जल्लोष केलेला पाहायला मिळाले, यावेळी महाराणा प्रताप राजपूत महासंघाचे अध्यक्ष श्री धनंजय सिहं सिसोदीया, यांच्या वतीने ठाण्यातील वर्तकनगर येथे फटाके वाजऊन तसेच ढोल ताश्या वाजवत मिठाई भरवत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ऍड अमित सिह, के पी मिश्रा राजेंद्र देशमुख आनंद सिह संजय सिह, सोनू सिह सुरीला, तुषार नाईक, शुभम त्रिपाठी , विनोद कुमार गुप्ता, सदानंद विश्वकर्मा , आदी पदाधीकारी तसेच नागरिक उपस्तित होते.
