जनतेज न्युज

सुभेदारी शासकीय विश्रामगृहात वंचित ची पत्रकार परिषद संपन्न , महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात दम नाही : प्रदेश अध्यक्षा_रेखाताई ठाकूर

प्रतिनिधी , औरंगाबाद:-आज दिनांक 09 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11:00 वा, सुभेदारी शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या नियुक्ती नंतर प्रथमच पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती,
या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की, वंचित बहुजन आघाडी स्वबळावर महानगरपालिकेच्या निवडणुका लढणार आहेत, शहरातील पाणी प्रश्न अति गंभीर झाला असून यावर ती शिवसेनेला कोणता तोडगा काढण्यात आला नाही, त्या अनुषंगाने औरंगाबादचे नागरिक वंचित बहुजन आघाडी च्या पाठीशी आहेत, आगामी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी नक्कीच यश प्राप्त करेल असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे.