प्रतिनिधी, बुलडाणा : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय बुलडाणा, शिक्षण विभाग जिल्हा परिषद बुलडाणा यांच्यातर्फे 9 ते 17 ऑगस्ट 2022 या दरम्यान करण्यात आले आहे. या अनुषंगाने आज सकाळी 11 वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे सामुहिक राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला.. यावेळी बुलडाणा शहरातील सर्व शाळा, महाविद्यालय, खाजगी शाळा, महाविद्यालय, स्काऊट ॲण्ड गाईड, एनएसएस, एनसीसी तसेच सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, क्रीडा मंडळे, संस्था असे एकूण सात ते आठ हजार नागरिक जिजामाता प्रेक्षागार येथे उपस्थित होते.
