जनतेज न्युज

सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद मिळताच बीडमध्ये जल्लोष

प्रतिनिधी, बीड : सुधीर मुनगंटीवार यांना मंत्री पद भेटल्यानंतर बीडमध्ये सुधीर मुनगंटीवार युवा प्रतिष्ठानच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. नव्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती. आणि त्यांनी शपथ घेतल्यानंतर लगेच बीडमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला आहे.यावेळी सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकर्त्यांनी बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके वाजवून आपला आनंद साजरा केलाय. गेल्या काही दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार होत नव्हता आणि आज अखेर मुहूर्त लागला आणि यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना संधी मिळाली. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा जल्लोष केला आहे.