जनतेज न्युज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज सातारा ते कराड निघणारया पायी जनआक्रोश मोर्चा स्थगित…

प्रतिनिधी , सातारा :सातारा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आज सातारा ते कराड निघणारया पायी जनआक्रोश मोर्चा हा स्थगित करण्यात आला आहे. सातारा येथुन खा.राजु शेट्टी यांच्या उपस्थित हा मोर्चा निघणार होता…यादरम्यान खा.राजु शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यन्त त्यांनी पायी मोर्चा काढला.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पोलिस आणि खा.राजु शेट्टी यांच्या सकारात्मक चर्चेतुन सातारा ते कराड निघणारया जन आक्रोश मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिलीय.या मोर्चात एकरकमी ऊसदर, वीज बिल माफी आणि गायीच्या दुधाला 5 रुपयाचे अनुदान जाहीर करणे अशा विविध मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता…यावेळी बोलताना त्यांनी 5 तारखेच्या बैठकीत निर्णय न झाल्यास पुढचे कराड ही आंदोलनाची रणभुमी असणार असल्याचा इशारा खा.राजु शेट्टी यांनी दिला आहे.