जनतेज न्युज

पदवीधर मतदारसंघातील भाजपचा विजय हा हे सरकार पडण्याचा पाया असेल- प्रवीण दरेकर

प्रतिनिधी , महाराष्ट्रातील वर्षभरापूर्वी आलेले हे सरकार म्हणजे अनैसर्गिकरीत्या स्थापन झालेले आहे. राज्यातील सामान्यजन,कष्टकरी,शेतकरी, महिला, युवक या कोणाच्याही संदर्भात हे सरकार आश्वस्त वातावरण निर्माण करु शकले नाही. त्यामुळे ही सर्व नाराजी येत्या पदवीधर निवडणुकीच्या माध्यमातून समोर येणार आहे. एकदा जनतेने ठरवलं, जनतेचा मूड बदलला आणि सगळे विजय झाले तर पदवीधर निवडणुकीतील हा विजय म्हणजे सरकार पडण्याचा पाया असेल,असे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हिंगोली येथे केले आहे.