प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील करजखेडा गावातील अनिल नंदकुमार पाटील या शेतकऱ्याचा दोन एकर उभा ऊस जळून खाक झाला आहे.
ऊसातून गेलेल्या विजेच्या ताराचे शॉर्ट सर्किट होऊन यामध्ये संपूर्ण ऊस आणि 2 एकरवरचे ठिबक सिंचन जळून खाक झाले आहे.
शेतकऱ्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी कळविले पण त्यांनी केलेल्या दुर्लक्ष्या मुळेच ही आग लागल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
दरम्यान ऊसाला लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले आहे.
