जनतेज न्युज

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पिक विमा कंपनीच्या कार्यालयात ठिय्या.

प्रतिनिधी , हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना खरिपातील सोयाबीनचा पिक विमा मिळालेला नाही. काही शेतकऱ्यांनी क्लेम करून सुद्धा अत्यल्प रकमेचा विमा मंजूर झाला आहे. याचाच जाब विचारण्यासाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स या कंपनीच्या हिंगोलीतील कार्यालयात ठिय्या दिला आहे. जोपर्यंत कंपनी शेतकऱ्यांचे विम्याची पूर्ण रक्कम देत नाही, तोपर्यंत येथून उठणार नाही असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तर काही शेतकरी मिळालेल्या विम्याच्या रकमेचे चेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना परत करणार आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.