प्रतिनिधी, नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील मागील चार सत्राच्या परीक्षा बहुपर्यायी प्रश्न घेऊन संपन्न झालेल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, गोंडवाना, जळगाव आणि सोलापूर विद्यापीठाणांनी ऑफलाइन MCQ परीक्षा घेत आहेत. आपणही या विद्यापीठा प्रमाणेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑनलाईन/ऑफलाइन बहुपर्यायी MCQ प्रश्ना द्वारे पद्धतीने घ्याव्यात.महाविद्यालयीन तासिका ह्या ऑनलाईन तसेच ऑफलाइन पद्धतीने झालेले आहेत, तसेच बराच काळ चाललेल्या एसटी संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन तासिका करणे शक्य झाले नाही तसेच दोन महिन्याच्या कालावधीत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करण्यात आला.महाराष्ट्रातील नागपूर, गोंडवाना, जळगाव आणि सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा MCQ पध्दतीने होत आहेत आणि बाकी विद्यापीठांच्या परीक्षा ऑफलाइन थेरी पध्दतीने होत असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणांत मोठा फरक येणार असून त्यामुळे समोरील ऍडमिशन साठी विद्यार्थ्यांना त्रास येऊ शकतो. त्यामुळे परीक्षा ह्या बहुपर्यायी पप्रश्नांच्या पद्धतीने घ्याव्यात हि विद्यार्थ्यांची मागणी आहे.
