जनतेज न्युज

शहरातील विविध परिसरात कचराकुंडी बंद मोहिमेची जनजागृती

प्रतिनिधी, औरंगाबाद : शहरातील विविध परिसरामध्ये मनपा प्रशासनाच्या वतीने कचराकुंडी बंद मोहीम संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून मनपाच्या पथकाच्या वतीने शहरातील विविध परिसरात जाऊन नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली असून कोणत्याही कुंडीमध्ये कचरा घंटागाडी मध्ये कचरा टाकण्यात यावा यासाठी नागरिक यांच्या असलेल्या समस्या सोडवण्यात आले असून या योजनेला शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.मनपाच्या वतीने खाम नदीची स्वच्छता करण्यात आली असून यामुळे महिला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्याच प्रमाणे शहरातील कचराकुंडी बंद यामुळे मिला ही नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मनपा चे प्रतिनिधी रत्ना सुतार यांनी माध्यमांशी बोलताना सदरील माहिती आज रोजी दिली आहे.ज्या नागरिकांच्या कचरा संदर्भात समस्या होत्या ज्या ठिकाणी घंटागाडी पोहोचत नाही त्या ठिकाणी छोटी गाडी किंवा हाताने कचरा गोळा करण्याची मोहीम मनपाच्या वतीने राबविण्यात येत असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.अशी माहिती मनपाच्या वतीने सदरील माहिती आज रोजी देण्यात आली आहे.मा. उपायुक्त साहेब यांचं आदेशानुसार माघील 15 दिवसापासून GVP स्पॉट मॉनिटरिंग करण्यात अली आहे, नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांच्या समसेच निवारण करून स्थानिक नागरिक, मनपा सफाई कर्मचारी ,रेड्डी कर्मचारी, इकोसत्व प्रतिनिधी यांच्या सहकार्यने आज 14 दिवशी कुंड्या वर रांगोळी टाकून बंद करण्यात आला.