प्रतिनिधी, रत्नागिरी : मी अजूनही शिवसेनेच असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत बोलताना सांगितले.सध्या ते पाली या ठिकाणी त्यांच्या निवासस्थानी आहेत.मी शिंदेंसोबत गेलो असतो तर मी गुवाहटीला गेलो असतो आणि तिथून बोललो असतो.सध्या एकसंघ राहणं गरजेचं असल्याचं सामंत यांनी म्हटले आहे. ज्या नेतृत्वानं आपल्याला संधी दिली ज्यामुळे आपण आमदार झालो त्या आमदारकीचं सोनं कसं होईल हे पाहणारे आम्ही कोकणातील आमदार आहोत.विकासाला ताकद देणं निधी घेऊन येणं , लोकांच्या इच्छा आकांक्षा पुर्ण करण ही आमची जबाबदारी आहे.शिरसाट काही बोलले म्हणून मी बोलणं योग्य नाही.मी जोडणार आहे तोडणारा नाही पक्ष जर पुन्हा उभा करायचा असेल तर मला वाटतं की कुठंतरी सगळ्यांना विश्वासात घेऊन जे आपल्यापासून दूर गेले आहेत, त्यांच्याशी चर्चा करणं गरजेचं आहे असं मला वैयक्तिक वाटतं. आमच्या लोकांमध्ये जे गैरसमज असतील ते दूर करणं गरजेचं. या सगळ्या संदर्भात कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.आमच्या प्रतोदानी काढलेली नोटीस आणि त्यांच्या प्रतोदानी काढलेली नोटीस त्यामध्ये टेक्निकली बाजू समजून घ्याव्या लागतील. त्यानंतरच यावर बोलणं उचित ठरेल, पण भविष्यात कायदेशीर लढाई अटळ आहे आणि कायदेशीर लढाईला आम्हाला सामोरं गेलं पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी गट निर्माण केला आहे म्हणजे त्यांचे मत बदलले असं नाही.
