प्रतिनिधी , हिंगोली- हिंगोली शहरात नववर्षाच्या तोंडावरच शांततेला गालबोट लागले आहे. शुल्लक कारणावरून दोन गटात झालेल्या हाणामारीचे रुपांतर तुफान दगडफेकीत झाले आहे. शहरातील रिसाला बाजार परिसरात काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही तुफान दगडफेक झाली. यामध्ये काही वाहने व विद्युत ट्रांसफार्मरची तोडफोड जमावाकडून करण्यात आली आहे. शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. परंतु, या घटनेमुळे रिसाला बाजार परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे . याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात 30 ते 40 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
