जनतेज न्युज

टरबूज फोडून मराठा समाजाच्या आंदोलकांनी केला उपमुख्यमंत्री फडणवीसांचा निषेध

प्रतिनिधी, धुळे : मराठा आरक्षणाच्‍या आंदोलनात होणारी दगडफेक आणि जाळपोळ यांविषयी उपमुख्‍यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्‍यांनी घर आणि वाहने यांची जाळपोळ करणार्‍या आंदोलकांवर भारतीय दंड विधान संहिता कलम ३०७ अंतर्गत गुन्‍हे नोंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मराठा आंदोलक पुन्हा देवेंद्र फडणवीसां विरोधात चांगलाच आक्रमक झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच मराठा समाजा विरुद्ध वक्तव्य केले आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणा विरोधात कोर्टात गुणरत्न सदावर्ते सारखा वकील पाठवला, आंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या तरुणांवर लाठी करायचा आदेश दिला आणि आता मराठा समाजाच्या आंदोलकांवर ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. अशा मराठा विरोधी वागणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा टरबूज फोडून निषेध आज मराठा आंदोलकांनी नोंदविला.  यावेळी भानुदास बगदे, विनोद जगताप, भोला वाघ, माजी आमदार प्रा. शरद पाटील, निंबा मराठे, राजू इंगळे, संदीप सूर्यवंशी, हेमंत भडक, आबा कदम, वसंत हराळ, बबलू बागुल, प्रफुल्ल माने संतोष लकडे रवी नागणे, बंटी देवकर यांच्यासह मराठा आंदोलक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.