जनतेज न्युज

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी आगारातून जाणाऱ्या काही एस.टी फेऱ्या बंद

प्रतिनिधी, रत्नागिरी : महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याने  प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या काही फेऱ्या पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवल्या आहेत. या फेऱ्या बंद केल्याची माहिती रत्नागिरी विभागाकडून देण्यात आली. एसटीच्या रत्नागिरी विभागातून कोल्हापूर, पुणे, बीड, लातूर, बेळगाव आदी भागांमध्ये फेऱ्या सोडण्यात येतात; परंतु या फेऱ्या आजपासून बंद करण्यात आल्या आहेत. आंदोलकांनी एसटीवरही दगडफेक, जाळपोळ केल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या फेऱ्या बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. जिल्ह्यातील लांब पल्ल्याच्या फेऱ्या बंद झाल्याने प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.