प्रतिनिधी, रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी ते देवशेत फणसवळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तेथील स्थानिक ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. गेली अनेक वर्षे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. संबंधित विभाग तसेच लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधूनही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आल्याचे उपोषणाकर्त्यांनी सांगितले. अखेर रस्ता दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
