प्रतिनिधी , अहमदनगर : शेतकरी संघटनांचा आज महाराष्ट्रात राज्यव्यापी एल्गार
केंद्र सरकाच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले राज्यव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी आज महाराष्ट्रत उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने घेतला आहे याचं पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या अकोले येथे किसान सभेचे अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तहसील समोर भाजीपाला ओतून आंदोलन करण्यात आले…
या आंदोलनामध्ये अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी आपल्या बरोबर आणलेला भाजीपाला अकोले तहसिल कार्यालया पुढे ओतुन देत “लुटता कशाला फुकट न्या”जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं अकोले शहरात निघालेल्या या मोर्चात हजारो शेतकरी सामिल झाले होते व कृषी विधेयक मागे घ्या अशी जोरदार मागणी किसान सभेकडुन करण्यात आली आहे. या मोर्चा वेळी कोणताही अनुचित प्रकार घडूनये म्हणून अकोले पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता…
